नवीन बातम्या
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला
*पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेविका प्रीती जॉर्ज यांचा स्तुत्य उपक्रम* *महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वृक्षांचे दान*
शिवसेनेनेतर्फे महापौर श्री.नितीन (भाई) पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा!!
‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियानका मालुसरे विजेत्या
पनवेलमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक साजाचा उत्साह
देवद येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

कंपनी सेक्रेटरी परीक्षेत विश्वेश सहस्रबुद्धे यांचे घवघवीत यश

4kNews कामोठे दि 30
कंपनी सेक्रेटरी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संपूर्ण भारतात १२ वा क्रमांक मिळवणाऱ्या पनवेलचे सुपुत्र श्री. विश्वेश अविनाश सहस्रबुद्धे यांचा गौरव रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.
या भव्य सत्कार सोहळ्यात पालकमंत्र्यांनी विश्वेश यांच्या परिश्रम, चिकाटी आणि ध्येयवेडाचे कौतुक करताना सांगितले की, “अशा तरुणांच्या यशामुळे समाजात प्रगतीची दिशा निर्माण होते आणि राज्याच्या विकासाला नवी गती मिळते. विश्वेश यांच्या पालकांचा देखील विशेष सन्मान करून त्यांच्या योगदानाचीही दखल घेताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, “पालकांच्या संस्कारांमुळेच विश्वेश आज या शिखरावर पोहोचला आहे.”


तसेच ह्या प्रसंगी बोलताना शिवसेना पनवेल महानगरप्रमुख तथा नगरसेवक ऍड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण ह्यांनी सांगितले कि “पनवेलकर म्हणून विश्वेशने देशभरात आपले नाव उज्ज्वल केले आहे. हे यश केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण पनवेलकरांचे आहे. तरुणाईस अशा यशस्वी उदाहरणांमुळे नवी प्रेरणा मिळते.”


या प्रसंगी पनवेल विधानसभा संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, खारघर शहरप्रमुख प्रसाद परब, पनवेल शहर संघटक अभिजित साखरे, तळोजा शहर संघटक राहुल कदम, महिला उपतालुकाप्रमुख स्मिताताई भोईर, नैना सुरते, युवासेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख अभिनय सोमण, युवासेना पनवेल विधानसभा अध्यक्ष जय कुष्टे, युवासेना पनवेल शहर प्रमुख कपिल कुरघोडे, तौफिक बागवान, गुलाब बागवान, मंदार काणे यांच्यासह शिवसेना व युवासेना पनवेल महानगरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top