नवीन बातम्या
उरण, रायगडचे सुपुत्र डॉ. मोहम्मद आमिर शेख यांना अभियांत्रिकी विषयात पीएच.डी.
नागाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी १२ कोटींहून अधिक गैरव्यवहाराचा संघर्ष समितीचा आरोप; २ सप्टेंबरला पंचायत समितीवर मोर्चाचा इशारा
खारघरमधील SIR प्रकरणाची व्याप्ती वाढली; पाच BLO निलंबित
प्रभाग १४ मध्ये आयुष्मान, आभा कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुष्पकनगर परिसरात इसमाचा मृतदेह आढळला
*पर्यावरण संवर्धनासाठी नगरसेविका प्रीती जॉर्ज यांचा स्तुत्य उपक्रम* *महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० वृक्षांचे दान*
शिवसेनेनेतर्फे महापौर श्री.नितीन (भाई) पाटील ह्यांचा वाढदिवस उतसाहत साजरा!!
‘श्रावण क्वीन २०२६’ स्पर्धेत रियानका मालुसरे विजेत्या
पनवेलमध्ये महाराष्ट्रीयन पारंपरिक साजाचा उत्साह
देवद येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग

पनवेल तालुक्यात मतदारांच्या गोपनीयतेचा प्रश्न; सर्व बीएलओंच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी

4kNews कामोठे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पनवेल, दि.30 (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील खारघर परिसरात मतदारांच्या गोपनीय माहितीशी संबंधित एसआयआर अर्जांच्या झेरॉक्स प्रती अनधिकृतपणे काढण्यात आल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. या प्रकारामुळे मतदारांच्या वैयक्तिक व गोपनीय माहितीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील यांनी रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे निवेदन देत पनवेल तालुक्यात कार्यरत असलेल्या सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


निवेदनात सर्व बीएलओंकडे असलेल्या मतदारांच्या कागदपत्रांची व अर्जांची सुरक्षितता तपासावी, तसेच मतदारांची वैयक्तिक माहिती अनधिकृतपणे बाहेर गेली आहे का, याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच मतदार यादी, एसआयआर अर्ज अथवा इतर निवडणूकविषयक कागदपत्रे अनधिकृत व्यक्तींच्या हातात गेली आहेत का, संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढून त्या कोणाला देण्यात आल्या आहेत का, याचीही तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


बीएलओंनी निवडणूक आयोगाच्या गोपनीयतेसंदर्भातील नियमांचे पालन केले आहे का, तसेच मतदारांचा डेटा कोणत्याही राजकीय पक्ष अथवा व्यक्तीला अनधिकृतपणे उपलब्ध करून देण्यात आला आहे का, याची चौकशी करण्यात यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात मतदारांच्या गोपनीय माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी पनवेल तालुक्यातील सर्व बीएलओंकडील मतदार नोंदणीसंबंधी कागदपत्रांचे विशेष लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही बबनदादा पाटील यांनी केली आहे.


मतदारांची वैयक्तिक माहिती आणि गोपनीयता हा अत्यंत गंभीर विषय असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते बबनदादा पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top