नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

पनवेल रेल्वे स्थानकात गॅस टँकरला गळती अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली; लोकल सेवा सुरळीत

4kNews कामोठे

पनवेल, दि.17 (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्थानकात रात्री जेएनपीटीहून रायपूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रेल्वेवरील एचपीसीएलच्या गॅस टँकरला अचानक गळती लागल्याची घटना घडली. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर मालगाडी आल्यानंतर ही गळती निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पनवेल अग्निशमन दल आणि रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्याने मोठी दुर्घटना टळली. 


गॅस गळतीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच तातडीने रिकामा करण्यात आला. खबरदारीचा उपाय म्हणून पनवेल स्थानकातून डाऊन दिशेने जाणाऱ्या दोन तसेच अन्य दोन गाड्या स्थानकाबाहेरच थांबविण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आवश्यक खबरदारी घेतली, तर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित अंतरावर ठेवत परिसरात गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली.
दरम्यान, एचपीसीएलच्या तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. तज्ज्ञांनी तातडीने उपाययोजना करत गॅस टँकरमधील गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले. त्यानंतर रात्री सुमारे पावणेबाराच्या सुमारास मालगाडीला डिझेल इंजिन जोडून कळंबोली स्थानकाच्या दिशेने रवाना करण्यात आले. तेथे मालगाडी थांबवून टँकरच्या गळतीच्या दुरुस्तीचे अंतिम काम हाती घेण्यात आले. 


या घटनेमुळे काही काळ रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली. मात्र, वेळीच केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, या घटनेचा लोकल रेल्वे मार्गावर कोणताही परिणाम झाला नसून पनवेलहून धावणारी लोकल सेवा सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top