नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

नवी मुंबई पोलीस दलातील १५ अधिकारी-अंमलदारांना मानाची पदके
१४ जणांचा आयुक्तालयात गौरव; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनाही अति-उत्कृष्ट सेवा पदक

4kNews कामोठे
पनवेल, दि.17 (वार्ताहर) : स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी मानाच्या सेवा पदकांची घोषणा केली. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अधिकारी-अंमलदारांसाठी ही घोषणा विशेष अभिमानाची ठरली असून, तब्बल १५ अधिकारी व अंमलदारांना अति-उत्कृष्ट, उत्कृष्ट आणि सी-६० सेवा पदके जाहीर झाली आहेत. 


स्वातंत्र्यदिनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या प्रांगणात आयोजित ध्वजारोहण समारंभात पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते पदकप्राप्त १४ अधिकारी-अंमलदारांचा गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनाही अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले असून, त्यांचा विशेष सन्मान पोलीस महासंचालकांच्या हस्ते स्वतंत्र सोहळ्यात करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबई पोलिसांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. जनतेच्या सुरक्षेसाठी अधिकारी व अंमलदारांनी केलेल्या अथक परिश्रमामुळेच हा गौरव मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. पदकप्राप्त अधिकारी-अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांचे अभिनंदन करून त्यांनी पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
अति-उत्कृष्ट सेवा पदक 


मिलिंद भारंबे (पोलीस आयुक्त), दीपक साकोरे (सहपोलीस आयुक्त), प्रमोद शेवाळे (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे), शैलेशकुमार लक्ष्मीनारायण आंचलवार (सहाय्यक पोलीस आयुक्त, एचटीयू), प्रमोद भास्करराव तोरडमल (पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा), अंबादास रघुनाथ कांबळे (पोलीस उपनिरीक्षक, मनपा अतिक्रमण), सुनील रघुनाथ (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, आरबीआय सुरक्षा), रघुनाथ नलावडे, विनोद भुजंग नवले (पोलीस हवालदार, बीडीडीएस), विकास प्रभाकर साळवी (पोलीस हवालदार, पनवेल तालुका) आणि शिवलिंग पांडुरंग ठिगळे (पोलीस हवालदार, गुन्हे शाखा) यांचा समावेश आहे.
उत्कृष्ट सेवा पदक
अभय आत्माराम सांगळे (पोलीस नाईक, कळंबोली पोलीस ठाणे), समीर सुरेश पाटील (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सुरक्षा शाखा) आणि अर्चना जितेंद्र म्हात्रे (महिला पोलीस हवालदार, विशेष शाखा) यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे. 


सी-६० सेवा पदक
पृथ्वीराज अजितसिंग घोरपडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाचक, पोलीस आयुक्त) आणि तुकाराम सुरेश नांगरे (पोलीस उपनिरीक्षक, जलद प्रतिसाद पथक) यांचा सी-६० सेवा पदकासाठी समावेश आहे.
दरम्यान, सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे, पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते तसेच एसआरपीएफचे कमांडंट संजय जाधव यांचाही मानाच्या सेवा पदकांच्या यादीत समावेश असून, त्यांचा सन्मान लवकरच करण्यात येणार आहे.
नवी मुंबई पोलीस दलातील अधिकारी-अंमलदारांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेचा झालेला हा गौरव पोलीस दलाचे मनोबल वाढविणारा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top