नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

स्वातंत्र्यदिनानिमित्त वडघर व गुरु लिंगेश्वर शाळेत उत्साहात ध्वजारोहण

4kNews कामोठे
पनवेल, दि.17  (वार्ताहर) : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त रा. जि. प. प्राथमिक शाळा, वडघर येथे उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


तसेच गुरु लिंगेश्वर शाळा, पनवेल येथेही स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील ध्वजारोहण स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाले. 


महेश साळुंखे हे समाजाप्रती असलेली आपली कर्तव्यभावना जपत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवितात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभही त्यांच्या वतीने नियमितपणे आयोजित केला जातो.
विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या त्यांच्या सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top