नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

ST स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे दि. 17
पनवेल,  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख कैलास बबनदादा पाटील, नगरसेविका प्रगती कैलास पाटील आणि नगरसेवक नितीन गावंड यांच्या वतीने रविवारी (दि. १६) आयोजित करण्यात आलेल्या ST स्मार्ट कार्ड व NCMC कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 


वॉर्डातील नागरिकांना स्मार्ट कार्ड तसेच NCMC कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात सकाळपासूनच नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. विविध वयोगटातील नागरिकांनी शिबिराला उपस्थित राहून कार्डसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली.
नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिक सुलभपणे लाभ घेता यावा, तसेच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले. शिबिराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.


शिबिर यशस्वी करण्यासाठी आयोजक व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे अशा प्रकारच्या लोकाभिमुख उपक्रमांची गरज अधोरेखित झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top