नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

१०८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; पनवेलमध्ये रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

4kNews कामोठे दि. 17

न्यू पनवेल, रुधिरसेतू सेवा संस्था, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ (मेवाड) उपसंघ पनवेल, इनर व्हील क्लब पनवेल सिटी आणि राजस्थानी महिला मंडळ-पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्थानक, साधना सदन, विश्राळी नाका येथे भव्य दि. १५ ऑगस्ट २०२६ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून १०८ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. 


रक्तदानासोबतच शिबिरात रक्तगट, हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि रक्तातील साखर तपासणी अशा विविध मोफत आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रुधिरसेतू सेवा संस्थेचे सुरेश रिसबूड, योगेश जोशी, सुनंदा कोठारी, मनीषा बोरा, सुवर्णा भंडारी, धनश्री बांठिया, नरेंद्रकुमार दसरे, उन्मेष लोहार, सानिका मराठे, माधुरी लोहार व साम्य लोहार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच इनर व्हील क्लब पनवेल सिटीच्या प्रेसिडेंट स्नेहल कल्याणकर, सेक्रेटरी विजेता कोठारी, कोषाध्यक्ष ध्वनी तन्ना यांच्यासह प्रतिभा डांगी, रीना गुंडेचा, शुभांगी दीक्षित, अर्चना परेश ठाकूर, जयश्री मंगलानी आणि नम्रता बांठिया यांनी सहकार्य केले. 


रुधिरसेतू सेवा संस्थेने सर्व रक्तदाते, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ जीवनदान’ हा संदेश समाजात पोहोचवत युवकांनीही अशा सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top