नवीन बातम्या
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

*बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहात संपन्न*


4kNews कामोठे 17
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवद शाखा यांच्या वतीने आयोजित दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास रायगड जिल्हाप्रमुख श्री. दीपक निकम, महानगरप्रमुख ॲड. समाधान काशीद, विभागप्रमुख श्री. विशाल भोईर, डॉक्टर सेल उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य डॉ. आशिष भांदेकर, उपविभागप्रमुख श्री. पाखरे तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे त्यांच्या मेहनतीसोबतच पालक व शिक्षकांच्या योगदानाचेही फलित आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top