4kNews कामोठे
पनवेल, दि. ३० (वार्ताहर) : पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या पुष्पकनगर परिसरात अंदाजे ४० वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांकडून मृताची ओळख पटविण्यासह नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे.

सदर इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक सुनील सरगर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

