नवीन बातम्या
प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना रोटरीचा ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड २०२६’ प्रदान
संगीतसाधनेचा डिजिटल स्वरमंच; रायगड भूषण पं. उमेश चौधरी यांच्या वेबसाईटचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उत्साहात अनावरण
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित कार्यालयात ध्वजारोहण व ध्वजवंदन
कामोठेतील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण
हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री व वह्यांचे वाटप; स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविणारा उपक्रम – आमदार महेश बालदी; ‘एकही आदिवासी बांधव कुड्याच्या घरात राहणार नाही’ – आमदार महेश बालदी
द्रोणागिरी नोडसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची मागणी.
उरणच्या प्रियांशी पाटीलची आंतरराष्ट्रीय भरारी; सलग दोन वर्षे ‘एशियन मेडलिस्ट’चा मान
पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोनच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षेत उच्च भरारी.
उरण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला.

१५ ऑगस्ट रोजीचे उपोषण पूढे ढकलले
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा गावच्या आक्रमकतेपुढे प्रशासन नरमले. विविध समस्यावर सकारात्मक चर्चा.
प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण तात्पुरते स्थगित.

१५ ऑगस्ट रोजीचे उपोषण पूढे ढकलले
नवीन शेवा व शेवा कोळीवाडा गावच्या आक्रमकतेपुढे प्रशासन नरमले. विविध समस्यावर सकारात्मक चर्चा.
प्रशासनाकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण तात्पुरते स्थगित.



4kNews कामोठे
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )
नविन शेवा व शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )ह्या दोन्ही गावांनी १५ ऑगस्ट २०२६ रोजी जो उपोषण व आंदोलन करणार होते  ज्यामध्ये शेवा व कोळीवाडा गावठाण जमीन आजतागायत संपादित नसताना दि.१७/०२/१९९० व दि.१७/०३/१९९० रोजीची २ खोटे आज्ञापत्रे बनवले आहेत ते रद्द करण्याबाबत व गेली ४० वर्षे दोन्ही गावांची पुनर्वसनाची जी फसवणूक व ठकवणे होत आहे त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी व पुनर्वसनाची पूर्तता करण्यासाठी जेएनपीटी प्रशासनाविरोधात आंदोलनाची तयारी चालू असताना दिनांक १३/८/२०२६ रोजी पोलिस प्रशासनमार्फत जेएनपीटी प्रशासन (जे एन पी ए प्रशासन )कडून दोन्ही गाव कमिटी ला चर्चेला बोलावण्यात आले होते.


  ह्या चर्चेला दोन्ही गावांच्या वतीने माजी आमदार  मनोहरशेठ भोईर व दोन्ही गावांचे ४-४ प्रतिनिधी उपस्थित होते. शासनाकडून जेएनपीटी चे अध्यक्ष  गौरव दयाल ,जेएनपीटी चे उपाध्यक्ष,सचिव मनीषा जाधव, उपजिल्हाधिकारी ( पुनर्वसन),पनवेल प्रांत कार्यालयाचे  पवन चांडक,उरण चे तहसीलदार  उद्भव कदम  व इतर सर्व शासकीय विभागांचे अधिकारी व न्हावा शेवा येथील सहाय्यक आयुक्त विजय चौधरी व न्हावा शेवा पोलिस स्टेशन चे सीनियर सूरज पाटील  हजर होते.


   चर्चेला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा चेअरमन यांनी दोन्ही गावच्या प्रतिनिधीना त्यांचे विषय मांडायला सांगितले व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली. शेवटी चेअरमन यांनी तहसीदारांना सांगितले की नवीन शेवा गावाचा जो १५.७५ हेक्टर जागेचा उपविभागीय अधिकारी पनवेल यांजकडील आदेश दी. १७/२/१९९० साली आज्ञापत्र बनवला आहे त्याचा कायदेशीर गॅझेट नाही व खोटा दस्तऐवज आहे व प्रलंबित असलेले पुनर्वसन मार्गी लावणे करिता  जिल्हाधिकारी अलिबाग ह्यांना पत्र लिहून ८ ते १० दिवसात मिटिंग आयोजित करून २ आज्ञापत्रे रद्द करा आणि राहिलेल्या अपूर्ण पुनर्वसन पूर्ण करण्याचे काम लवकरात लवकर करुन घेणे असे आदेश दिले. व तसे पत्र नवीन शेवा कमिटीला द्या. व सिडको संबंधित जागेचा जो प्रश्न प्रलंबित आहे त्या संदर्भात सिडको एमडी ह्यांना सुद्धा जेएनपीटी ने पत्र पाठवून द्यावा व चर्चा करावी असे यावेळी ठरले.


 त्याच प्रमाणे हनुमान कोळीवाडा गावाकरिता जेएनपीटी टाउनशिप च्या मागे १०.१६ हेक्टर जमीन  देण्याचा प्रस्ताव तयार आहे .परंतु हनुमान कोळीवाडा गावचा पुनर्वसनाचे अनुषंगाने  उपविभागीय अधिकारी पनवेल यांजकडील आदेश दि. १७/२/१९९० रद्द करणे बाबत व हनुमान कोळीवाडा ह्यांचे प्रलंबित असलेले पुनर्वसन तत्काळ करणेबाबत दोन्ही गावांची येत्या ८ ते १० दिवसांत मा. जिल्हाधिकारी,रायगड,अलिबाग यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात यावे असे जेएनपीटी चेअरमन ने उरण तहसीलदार यांना तशा प्रकारचे दोन्ही गाव प्रतिनिधीना पत्र देण्याचे सांगितले व होणारे १५ ऑगस्ट चे उपोषण व आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. ह्यामध्ये माजी आमदार  मनोहरशेठ भोईर ,वकील सिद्धार्थ  इंगळे व कोळी समाजाचे नेते नंदकुमार पवार ह्यांनी दोन्ही गावांच्या वतीने जोमाने बाजू मांडली. 


 ह्या बैठकीकरिता नवीन शेवा गावच्या सरपंच सोनल घरत, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमलाकर पाटील,  चंद्रकांत घरत,सल्लागार  पंडित घरत, पंचायत समिती सदस्य दिपक भोईर, महेश म्हात्रे, कृष्णा घरत, हेमंत म्हात्रे,लक्ष्मण म्हात्रे व इतर पदाधिकारी
त्याचप्रमाणे हनुमान कोळीवाडा गावाचे सरपंच परमानंद कोळी, सामाजिक कार्यकर्ते रमेश कोळी, सुरेश कोळी, नितीन कोळी व इतर पदाधिकारी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top