नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

सकल मराठा समाज मंडळ खांदाकॉलनीच्या वतीनेउद्योजक रामदास शेवाळे यांना  “मराठा भूषण” पुरस्कार प्रदान


पनवेल दि.०६ (वार्ताहर) : सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून मराठा समाजाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील जनसेवक उद्योजक मा. रामदास शेवाळे यांना यावर्षीचा ‘मराठा भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनी, पनवेल यांच्या वतीने संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आला. 


वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम मराठा भवन, सेक्टर ९, खांदा कॉलनी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. दिवसभराच्या कार्यक्रमात सत्यनारायण महापूजा, संत जनाबाई महिला भजन मंडळ यांचे भक्तिमय भजन, तसेच ‘मराठा कृतज्ञता सन्मान सोहळा’ घेण्यात आला. या सन्मान सोहळ्यात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २८ ऑगस्ट २०२५ रोजी केलेल्या आरक्षण आंदोलनासाठी महाराष्ट्रभरातून आलेल्या मराठा बांधवांची राहण्याची व जेवणाची सेवा करणाऱ्या बांधवांचा, सामाजिक संघटना, शिक्षण संस्था, नागरिक यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मराठा समाजाची कन्या कु.वैष्णवी गणेश कडू हिचा परदेशात कमर्शियल पायलट प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. 

या सोहळ्यास मराठा भूषण उद्योजक रामचंद्र ढोबळे, मराठा समाज रायगड जिल्हा समन्वयक विनोद साबळे, गणेश कडू, परिवर्तन सामाजिक संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे, नगरसेवक एकनाथ गायकवाड, गणेश पाटील, आगरी शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक प्रा. भगत सर, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, भीमराव पोवार, मराठा समाज – कामोठे, कळंबोली, खारघर, करंजाडे, आदई, पनवेल चे मराठा बांधव, सकल मराठा समाज मंडळ खांदा कॉलनी चे कार्यकारिणी मंडळ पदाधिकारी, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. 


सकल मराठा समाज मंडळाच्या सामाजिक बांधिलकीचा नवा अध्याय म्हणून या कार्यक्रमाची नोंद झाल्याचे मत उपस्थित मान्यवर यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी सकल मराठा समाज खांदा कॉलनी च्या कार्याची माहिती देत मराठा समाजाला सहकार्य करणाऱ्या  मराठा समाजाच्या एकात्मतेचा आणि समाजोन्नतीचा आढावा घेत कार्याचा गौरव केला.सचिव सदानंद शिर्के यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top