नवीन बातम्या
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार
आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,
फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात
शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा उपक्रम 1 जुलै रोजी
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी बाळा कुंभार तर उरण पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी पृथ्वीराज घोरपडे
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळमधून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत

बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 


पनवेल ,दि. 6( वार्ताहर ) :  तालुक्यातील बंबई पाडा परिसरात रविवारी सकाळी एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात कारणावरून महिलेचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बंबई पाडा येथील रहिवाशांना सकाळच्या सुमारास संबंधित महिला घरात मृतावस्थेत आढळून आली. तिच्या गळ्यावर आढळलेल्या खुणांवरून हा खून गळा आवळून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ पोलीसांना कळवले. घटनास्थळी पोलीस पथक दाखल होऊन पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

या प्रकरणातील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वैयक्तिक वाद, कौटुंबिक कारण किंवा इतर कोणता गुन्हेगारी हेतू याबाबत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. दरम्यान, परिसरातील नागरिकांकडूनही चौकशी सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे बंबई पाडा परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top