पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल शहरात राहणार्या एकाच कुटुंबातील दोन वेळा गाडी जाळणार्या अज्ञात व्यक्तींचा शोध पनवेल शहर पोलीस करीत असून याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा वपोनि नितीन ठाकरे यांनी केले आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पनवेल शहर पोलिसांच्या हाती लागले असून त्यामध्ये अज्ञात व्यक्ती या सदर ठिकाणी येवून त्यांच्या दोन्ही गाड्या वेगवेगळ्या वेळी जाळताना दिसत आहेत. तसेच त्यातील एकाने सदर कुटुंबाच्या घराचे फोटो रात्रीच्या वेळी काढल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे हे कुटुंब अत्यंत भितीच्या छायेच्या जगत आहेत. तरी याबाबत पनवेल शहर पोलिसांनी या व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला पनवेल, कळंबोली, तळोजा, शिळ डायघर, कल्याण किंवा इतर भागात आढळून आल्यास त्यांनी तात्काळ पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधावा.
