नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल शिवसेनेतर्फे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव


पनवेल विधानसभा मतदारसंघात विजयाचा चौकार मारणारे भारतीय जनता पक्षाचे विजयी उमेदवार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांना पनवेल शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी मिळून अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून सामान्य शिवसैनिकापर्यंत सर्वांनीच युती धर्माचे पालन करत प्रशांत ठाकूर यांचे निवडणुकीत एकदिलाने काम केले. त्यांच्या विजयानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सामूहिकरित्या ठाकूर यांच्या निवासस्थानी त्यांचा जाहीर सत्कार करत अभिनंदन केले.


यावेळी संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, महिला संपर्कप्रमुख शिल्पा देशमुख, उत्तर रायगड महिला जिल्हाप्रमुख सुप्रिया साळुंखे, महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण, उपजिल्हाप्रमुख परेश भाई पाटील, महिला जिल्हा संघटिका रीना पाटील, महानगर संघटक मंगेश रानावडे, महिला तालुका प्रमुख मंदाताई जंगले, तालुका उपसंघटक नरेश आत्माराम, उपमहानगरप्रमुख, महेश सावंत, सचिन मोरे, पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे, नवीन पनवेल शहर प्रमुख अतुल मोकल, खारघर शहर संघटक इम्तियाज जलील, तळोजा विभागप्रमुख प्रकाश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक राकेश गोवारी,  पनवेल शहर व नवीन पनवेल शिवसेनेचे सर्व उपशहरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटनेचे प्रमुख प्रतिनिधी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळेस आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपूर्ण निवडणुकीत आपण एक टीम म्हणूनच काम केले. याचा अभिमान व्यक्त करत सर्व शिवसेना पदाधिकारी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top