नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातुन अपहरण झालेल्या 3 महिन्यांच्या बाळाची पनवेल शहर पोलीस ठाण्याकडुन 24 तासात सुटका व आरोपीता ताब्यात



पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन दिनांक 30/05/2025 रोजी 15.00 वा. ते 15.30 वा. च्या दरम्यान 3 महिन्यांच्या बाळाचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केले म्हणुन पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. न. 292/2025 BNS 137 (2) (IPC 363) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.



सदरचा प्रकार हा संवेदनशील व गंभीर स्वरुपाचा असल्याने तात्काळ यातील अपहृत बाळ व आरोपीताचा शोध घेणेकामी पनवेल शहर पोलीस ठाण्याकडुन 5 पथके तयार करण्यात आली. सदर पथकाने पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता एक महिला ही यातील अपहृत बाळासह पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसताना दिसुन आली. त्यावरुन सदर आरोपीता व अपहृत बाळाचा शोध घेणेकामी कर्जत, लोणावळा, दौंड, पुणे येथे पथके रवाना केली. सदर पथकांनी केलेल्या तपासामध्ये यातील आरोपीता ही पोलीसांना गुंगारा देण्यासाठी लोणावळा येथुन रेल्वेने पुन्हा पनवेल च्या दिशेने आल्याचे दिसुन आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या आजु बाजुच्या पोलीस ठाण्यास गुन्हयाच्या घटनेबाबत माहिती देऊन यातील अपहृत बाळ व आरोपीतेचा शोध घेणेबाबत कळवण्यात आले होते.

गुन्हयाच्या तपासादरम्यान कळंबोली पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. राजेंद्र कोते यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यास कळवले की, त्यांच्या पोलीस ठाण्याच्या नेमणुकीस असलेल्या सपोनि तृप्ती शेळके या कळंबोली सर्कल कडुन कळंबोली पोलीस ठाण्याकडे येते असताना त्यांना यातील आरोपीता ही अपहृत बाळासह कळंबोली फायर ब्रिगेड जवळ दिसुन आल्याने त्यांनी आरोपीतेस ताब्यात घेऊन अपरहत बाळाची सुटका केली असल्याचे कळवले. त्यावरुन तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याकडील अधिकारी व अंमलदार यांनी कळंबोली पोलीस ठाणे येथुन अपहृत बाळ व आरोपीतेस पनवेल शहर पोलीस ठाणे येथे घेऊन आलेले आहेत. त्यानंतर अपहृत बाळास सुखरुप तिच्या आईच्या ताब्यात दिलेले आहे. यातील आरोपीता नामे रोशनी विनोद वागेश्री वय 35 वर्षे, राह पनवेल रेल्वे स्टेशन समोरील झोपडपट्टी, पनवेल ही पनवेल शहर पोलीसांच्या ताब्यात असुन गुन्ह्याचा पुढील तपास चालु आहे.



सदरचा गुन्हा उधडकीस आणण्यासाठी श्री. मिलींद भारंबे, मा. पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई; श्री संजय ऐनपुरे, मा. पोलीस सह आयुक्त सो, नवी मुंबई; श्री प्रशांत मोहीते सो, पोलीस उपायुक्त सो, परि 02, पनवेल, नवी मुंबई; श्री. अशोक राजपुत, मा. सहा. पोलीस आयुक्त सो, पनवेल विभाग, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे, पोनि (गुन्हे) शाकीर पटेल, पोनि (प्रशा) अभिजीत अभंग, सपोनि प्रकाश पवार, सपोनि तृप्ती शेळके (नेम- कळंबोली पोलीस ठाणे), पोउपनि विनोद लभडे, पोउपनि अंकुर शेलार, पोउपनि उद्धव सोळंके, पोहवा /1851 महेंद्र वायकर, पोहवा/1620 अमोल डोईफोडे, पोहवा/1378 गंथडे, पोहवा/2228 अमोल पाटील, पोहवा/2103 बोरसे, पोहवा/99 महेश पाटील, पोशि/किरण कराड, पोशि/विशाल दुधे, पोशि/नितीन कांबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top