4k समाचार 23
नवी मुंबई – पनवेल येथे १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ ते पावणेनऊच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी ६३ वर्षीय भारती धरणीधर दवे यांना लुटल्याची घटना घडली.

साईनगर रोडवरून घराकडे पायी जात असताना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले.
या प्रकरणी पनवेल पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
