कामोठे | 4K समाचार
कामोठे परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका डॉ. हेमलता रवि गोवारी यांनी आज नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नारायण बांगर आणि शहर अभियंता देसाई साहेब यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी कामोठ्याला इतर शहरांच्या तुलनेत पाण्यासंदर्भात दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा मुद्दा ठोसपणे मांडला. यावेळी आयुक्त बांगर आणि अभियंता देसाई यांनी लवकरच पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
