4k समाचार
वाशीतील सेक्टर १७ मध्ये शनिवारी रात्री झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. डोंबिवलीचे रहिवासी सद्दाम शेख हे अडीच लाख रुपयांची रोकड घेऊन वाशीत आले होते. त्यांनी रस्त्यालगत कार उभी केली असता, अज्ञात चोरट्यांनी कारची काच फोडून आतील रोकड व अन्य साहित्य लंपास केले.

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असून तांत्रिक तपासालाही वेग देण्यात आला आहे.
