4 k समाचार
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उरण रेल्वे स्टेशन परिसर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या निर्देशान्वे महाविद्यालयातीच्या वतीने हा उपक्रम राबवला गेला.

महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वाल्मीक गर्जे, स्टेशन व्यवस्थापक मा. जगदीश जाधव, रेल्वे सुरक्षा विभागातील ए एस आय आकाश खोब्रागडे,हेडकॉन्स्टेबल कृष्णा सिंग,हेड कॉन्स्टेबल रानसिंह मीना, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. ए. आर. चव्हाण, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एच. के. जगताप, इतिहास विभाग प्रमुख डॉ. एम.जी. लोणे, प्रा. अनुपमा कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. विनिता तांडेल, डॉ. दत्ता हिंगमिरे आदींच्या उपस्थितीत विविध वृक्ष लावण्यात आली. यावेळी एकूण १२० वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरण रक्षण व संवर्धन ही काळाची गरज असल्याचा संदेश समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. या वृक्षारोपण मोहिमेत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला व वृक्षारोपण यशस्वी केले.
