नवीन बातम्या
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर

नमो चषक क्रिकेटमध्ये भिंगारी संघ अव्वल

पनवेल (प्रतिनिधी) नमो चषक २०२५ अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी संघाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. त्यांना १ लाख ११ हजार १११ रुपये व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत उपविजेता वहाळ संघ तर तृतीय क्रमांक वळवली संघाने मिळवला.

या स्पर्धेतील मालिकावीर वळवली संघाचा सुयोग म्हात्रे, उत्कृष्ट फलंदाज वहाळ संघाचा प्रयास कोळी, उत्कृष्ठ गोलंदाज वहाळ संघाचा घनश्याम पाटील तर उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक भिंगारी संघाचा सूरज परदेशी ठरला.


  भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलतर्फे पनवेल विधानसभा मतदार संघात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक २०२५ चे आयोजन करण्यात आले  होते.

  त्या अंतर्गत खारघर मधील सेक्टर १४ येथील जय हनुमान चेरोबा बापदेव मैदानावर प्रवीण स्पोर्टस वेल्फेअर असोसिएशनच्या संयोजनाखाली भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा दिवस-रात्र या स्वरूपात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेतील उपविजेत्या संघाला ५५ हजार ५५५ रुपये तर तृतीय क्रमांकाच्या संघास ३३ हजार ३३३ रुपये तसेच मॅन ऑफ दि सिरीजला दुचाकी मोटारसायकल अशी भरघोस पारितोषिकांसोबत दररोज प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये एकूण चार सायकल बक्षीस देण्यात आली.

  या स्पर्धेत कानपोली, दापोली, मुर्बी, पेठ, बामणडोंगरी, कुंडेवहाळ, कामोठे, ओवळे, बापदेव पोदी, भैरवनाथ विचुंबे, स्व. महादेव पेठाली, अथर्व इलेव्हन घोट, गावदेवी भातानपाडा, हिमांशू वळवली, मंगलमूर्ती घरकुल, जय हनुमान नावडे, यंगस्टार वहाळ, जिवा इलेव्हन पेंधर, धाकटा खांदा, शनिकृपा कोपरा, शिवशक्ती खारघर, श्रीराम शिरढोण, उलवा आणि ओम साई भंगारपाडा या नामवंत २४ संघांचा सहभाग होता. या स्पर्धेचे भव्य दिव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध झालेली हि स्पर्धा खेळाडू तसेच क्रिकेटप्रेमींसाठी एक पर्वणी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top