पनवेल, दि.13 (4kNews कामोठे ) ः खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सुकापूर येथील बालाजी सिम्फोनी सोसायटीमध्ये सुरक्षा बैठक वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

यावेळी सपोनि बळवंत पोलीस पाटील यांनी उपस्थित सोसायटीमधील रहिवाशांना व पदाधिकार्यांना सुरक्षितता जनजागृती बाबत मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने सायबर सुरक्षा,डायला 1930, 112, नवी मुंबई वॉट्सअँप चायनल, सायबर सेफ नवी मुंबई, ऑफिशियल युट्युब चायनल बाबत माहिती दिली. या बैठकीला रहिवाशांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच आपल्या विविध शंकांचे निरसन केले
