4k समाचार
पनवेल दि. 20(संजय कदम) : चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनचालकांचे गुलाबाचे फुल देऊन अभिनंदन केले.

चालक दिनानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखा हद्दितील पळस्पे ते टी पॉइंट दरम्यान निलेश ढाबा येथील जेएनपीटी मुख्य पॉईंटवर वाहन चालकना त्यांच्या कर्तव्या बाबत वाहतूक विभागामार्फत त्यांची प्रशंसा व गुलाबाचे फुल, अल्पोपहार देऊन अभिनंदन करून भविष्यात त्यांनी अशाच प्रकारे आपले कर्तव्य जबाबदारीने करावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी अधिकारी वपोनि औदुंबर पाटील यांच्यासह वाहतूक अंमलदार तसेच वाहनचालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
