पनवेल, दि.3 4 k सामाचार(वार्ताहर) ः पनवेल महापालिका अंतर्गत येणार्या खारघर शहराला स्मार्ट सिटी हा दर्जा मिळाला असला तरीही शहरात मुख्य रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहेत फक्त 15 दिवसांपुर्वी केलेल्या

डांबरीकरणातुन रस्ते वाहुन गेले व भ्रष्ट कंत्राटदारांचा भ्रष्टाचार उघडा पडला आहे , महापालिका कोटीचे निविदा देतात ते रस्ते बांधण्यासाठी काढतात का खड्डे पाडण्यासाठी असा प्रश्न आता खारघर वासीयांना व समस्त पनवेलकरांना पडलेला आहे. याच खड्ड्यांच्या भ्रष्टाचाराबाबत आज शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली तसेच शिवसेना महानगर प्रमुख अवचित राऊत यांच्या आयोजनातून खड्डेमय खारघर विरोधात शिवसेना वतीने खड्डामध्ये झाडे लावत आंदोलन करण्यात आले.

यावेळी समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी खारघर शहरप्रमुख गुरु म्हात्रे,शहर प्रमुख यतीन देशमुख, सदानंद शिर्के, प्रवीण जाधव, विभाग संघटक रामचंद्र देवरे ,युवासेना शहर अधिकारी निखिल पानमंद , अभिजीत ओझा , अश्विन ससाणे ,रोहीत बालगुडे , संतोष टाकावले ,सिद्देश गुरव, निखिल पाटील, शाखाप्रमुख संतोष शिंदे , महिला आघाडी उपजिल्हा संघटिका सौ, रेवती सकपाळ, शहर संघटिका सौ. संगीता राऊत, सौ. नंदा चेडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
