नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

साईनाथ गावंड यांना आदर्श शिक्षक पुरस्कार.





उरण दि 22 विठ्ठल ममताबादे )लायन्स इंटरनॅशनल जिल्हा ३२३१-अ-४ मार्फत उरण तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा
शनिवार दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी  स. ९.३० वा.  उरण नगरपरिषद शाळा क्र.१/२ येथे  शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबरोबरच सामाजिक योगदानाने समाज उजळविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला.”उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” सोहळा कार्यक्रमासाठी उरण  तालुक्यातील जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा मोरा येथील  साईनाथ रामदास गावंड यांची निवड करण्यात आली. 


 शाळेमध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांमध्ये प्रगती व्हावी किंवा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळावं म्हणून सेवा संयोग फाउंडेशन मुंबई यांच्याशी संपर्क साधला. व या संस्थेकडून जवळजवळ १५ वर्ष त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दप्तर, वह्या, पुस्तके, कंपास बॉक्स, चित्रकला वही अशा प्रकारचे साहित्य दरवर्षी त्यांच्या प्रयत्नतुन  मिळत राहिल्या. तसेच भारतीय स्टेट बँक उरण  यांच्याकडून सन २०११-१२ साली शाळेसाठी एक एक्वागार्ड व संगणक मिळवून घेतला. तसेच दहागाव परिसरामध्ये देखील बँकेकडून एक्वागार्ड मिळवून सर्व पूर्व भागातील शाळांना वाटप करण्याचा सहकार्य केले. पुढे सेवा संयोग फाउंडेशन कडून १२ लाख किमतीचे  सोलर पॅनल ची मागणी करून सोलर पॅनल शाळेसाठी बसवून घेतला. तसेच विद्यार्थ्यांसाठी सेवा सेवक फाउंडेशन कडून प्रयोगशाळा बनवून घेतली.


  दरवर्षी पहिली ते दहावी  प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना वडिलांच्या नावाने बक्षीस देत असतात तसेच काही शाळांना देखील अशाप्रकारे ठेव ठेवून बक्षीसंच वाटप करत असतात. श्री रामदास गवत्या गावंड  कला, क्रीडा, सामाजिक संस्था आवरे यांच्या माध्यमातून पूर्व विभागातील सर्व शाळांना शैक्षणिक साहित्यात दरवर्षी वाटप करत असतात. तसेच बऱ्याच शाळांना स्पीकर देखील देण्यात आलेलं आहे.ते रायगड जिल्हा खाजगी कर्मचारी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. तसेच विद्यार्थ्यांचे वेगवेगळे उपक्रम घेऊन त्यांना उपक्रमशील बनवत असतात. शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपतात या सर्व गोष्टींचा विचार करून साईनाथ रामदास गावंड यांना लायन्स इंटरनॅशनल  क्लब  यांच्यावतीने संगीता माने प्रशासन अधिकारी, उरण  यांच्या हस्ते  त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी लाईन्स क्लब ऑफ उरणचे एमजेएफ लायन्स संजीव  सूर्यवंशी जिल्हा प्रांतपाल यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. 


   कार्यक्रम प्रसंगी लायन नीलिमा नारखेडे जिल्हा सभापती( शिक्षक गौरव समारंभ ) यांनी आपल्या मार्गदर्शनपर शब्दांमध्ये एमजेएफ संजीव  सूर्यवंशी जिल्हा प्रांतपाळ यांच्या कार्याबद्दल माहिती दिली व लायन्स इंटरनॅशनल क्लब बद्दल थोडक्यात सांगितली. एमजेएफ लायन डॉ. साहेबराव ओहोळ अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ उरण यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रम प्रसंगी लाईन्स इंटरनॅशनल क्लब ऑफ उरणचे एमजेएफ संजीव सूर्यवंशी जिल्हा प्रांतपाल, एमजेएफ लायन चंद्रकांत ठक्कर, एमजेएफ लायन सदानंद गायकवाड, लायन नीलिमा नारखेडे जिल्हा सभापती, लायन ज्ञानेश्वर कोठावदे,एमजेएफ लायन दीपक पाटील, लायन अंशू पाल, एमजेएफ लाईन डॉक्टर साहेबराव ओहोळ, प्रवक्ता आशिष कुमार केदार व सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top