पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल मार्फत विस्टा फूड्स च्या सी एस आर फंडा द्वारे पनवेल परिसरातील कॅन्सर रुग्णांना कमीत कमी खर्चात केमोथेरपी ची ट्रिटमेंट मिळण्यासाठी डॉ. सलिल पाटकर यांच्या इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर चे Affordable Chemotherapy Center ला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

या प्रसंगी विस्टा फूड चे मार्गदर्शक सल्लागार चंद्रशेखर सोमण यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी अनेक वर्षे, अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली असून यापूर्वी मागील वर्षी १९० कॅन्सर रुग्णांना याचा फायदा या सेंटर द्वारे करून दिला या प्रामाणिक आरोग्य सेवेबाबत डॉ. सलिल पाटकर यांचे कौतुक करून आमच्या सी एस आर ची योग्य ठिकाणी उपयोग वापर होत असल्याचे समाधान व्यक्त केले व ५ लाखाचा चेक पुढील सेवे साठी सुपूर्द केला. रोटरी प्रांत ३१३१चे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांनी मार्गदर्शन करताना रोटरी च्या माध्यमातून विविध प्रकल्पांना विस्टा फूड तर्फे मदत केली जाते व त्याचा विनियोग योग्य प्रकारे कसा केला जातो हे सांगितले तसेच व्हीस्टा कंपनीचे सीईओ श्री भूपिंदर सिंग व चंद्रशेखर सोमण यांचे आभार मानले.

यापूर्वी देखील कॅन्सर रुग्णांसाठी मदत म्हणून डॉक्टर सलील पाटकर यांच्या इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटरला चार लाख रुपयांची मदत व्हीस्टा फूडतर्फे करण्यात आली होती. पटवर्धन हॉस्पिटल ला देखील रुपये पाच लाखाची आर्थिक मदत देण्यात आली असून यापूर्वीही पटवर्धन हॉस्पिटल पनवेल मधील उपजिल्हा रुग्णालय इत्यादी इस्पितळांना भरीव आर्थिक मदत व्हिस्टा प्रोसेस फुड्स तर्फे करण्यात आली आहे.

कंपनीच्या सीएसआर फंडाचा वापर हा पूर्णतः रुग्णसेवेसाठी समर्पित भावनेने करण्यात येत असून यामध्ये रुग्णसेवेच्या कार्याचा भरीव अनुभव असलेले कंपनीचे सल्लागार चंद्रशेखर सोमण, व्यवस्थापकीय संचालक भूपिंदर सिंग यासह संपूर्ण व्हिस्टा प्रोसेस ची टीम कार्यरत आहे. याप्रसंगी या कार्यक्रमासाठी डॉ. सलिल पाटकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल चे अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, डॉ. सुरेश मोरे, कंपनी व्यवस्थापनाचे प्रथमेश पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
