पनवेल, दि.28 (4kNews) ः विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आ.विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी पनवेल शहरात असलेल्या श्री पांजरापोळ गो-रक्षण संस्था (गौशाळा) येथे जावून त्या ठिकाणी सुरू असलेल्या नुतनीकरण प्रकल्पाद्वारे बांधण्यात येणार्या गोशाळेची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत मा.नगरसेवक राजू सोनी, व्यावसायिक नितीन मुनोत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या पांजरापोळ गोशाळेत जवळपास 100 पेक्षा अधिक गोमाता आहेत. सेवाभावी वृत्तीने येथे गोमातेची काळजी घेतली जाते.

बर्याच वेळेला येथे पशु आहार व चारा वाटपाचे देखील कार्यक्रम संपन्न होत असतात. यावेळी आ.विक्रांत पाटील यांनी गोमातेचे पूजन करून संस्था चालकांकडून गोमाता संदर्भात पूर्ण माहिती घेतली. तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक ती पूर्ण मदत करू असे आश्वासन सुद्धा दिले.
