4kNews कामोठे
अनिल चव्हाण, दीपक निकम यांचे मार्गदर्शन; ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार
पनवेल, दि. 25(वार्ताहर) : पनवेल ग्रामीण भागातील नागरी समस्या आणि मूलभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ शिवसैनिकांची बैठक वावंजे येथे पार पडली. यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीला पक्षाचे सहसंपर्कप्रमुख अनिल चव्हाण, रायगड जिल्हाप्रमुख दीपक निकम आणि उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्थानिक प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

या बैठकीला ज्येष्ठ शिवसैनिक शांताराम कुंभारकर, बबन फडके, दत्ता फडके, विष्णू भोईर, शशी भगत, ज्ञानेश्वर माळी, परशुराम गायकर, एकनाथ बोंडे, मनोज कुंभारकर, संदीप पाटील, तुळशीराम मुकादम, संतोष वालपकर, आनंद वालपकर, जगन्नाथ म्हात्रे, प्रमोद पाटील, रामदास गोंधळी, भालचंद्र तसेच कळंबोलीचे विभागप्रमुख विश्वास पेटकर आणि शैलेश चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

