4kNews कामोठे दि. 25
पनवेल (प्रतिनिधी) : भाजप उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीअंतर्गत पनवेल उत्तर मंडलातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर नितीन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

या नियुक्त्यांमध्ये गोविंद नामदेव पाटील यांची पनवेल उत्तर मंडल चिटणीसपदी, नितीन भोईर व प्रथमेश म्हात्रे यांची उपाध्यक्षपदी, अमित रॉय यांची उत्तर भारतीय कामगार आघाडीच्या अध्यक्षपदी, विघ्नेश पाटील यांची एमआयडीसी उपाध्यक्षपदी, तर अनिरुद्ध पाटील यांची उत्तर मंडल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी उत्तर रायगड कामगार जिल्हा आघाडीचे अध्यक्ष रवींद्र नाईक, पनवेल उत्तर मंडल अध्यक्ष हरेश पाटील, उपेंद्र मराठे, कार्यालयीन चिटणीस मधुकर उरणकर, सहचिटणीस बाळाराम पाटील, प्रसिद्धीप्रमुख राजपाल शेगोकार, सदस्य श्याम भगत आणि सचिव मोहन घाडगे आदी उपस्थित होते.
या नियुक्त्यांमुळे संघटनात्मक कार्याला गती मिळून कामगारांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

