नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातुन 6 महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका


पनवेल, दि.3 (संजय कदम) ः मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून 6 महिलांची गुन्हे शाखा पोलिसांनी सुटका केली आहे.
पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सचिन गुंजाळ यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अनैतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, आरपणाच सलुन आणि स्पा शॉप नंबर 01, देवीज्योती हॉटेलचे जवळ, जुहूनगर, जुहूगाव, सेक्टर 11, वाशी, नवी मुंबई येथे 6000/- रूपये घेवुन मसाजच्या नावाने तेथे असलेल्या महिलांकडुन जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत आहेत.  

वपोनि घोरपडे यांनी त्यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे बनावट ग्राहकास आरपणाच सलुन आणि स्पा येथे पाठवले. बनावट ग्राहकाच्या सांकेतीक इशार्‍यावरून पथकाने लॉजवर छापा टाकला. त्याठिकाणी 06 महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या मिळुन आल्या. स्पाची महिला मॅनेजर असिमा रॉबिन घोष, वय 34 वर्षे, रा. रूम नंबर 03, साईकुंज सोसायटी, सेक्टर 11, वाशी, नवी मुंबई. मुळ रा. कोलकत्ता व तिचा पार्टनर पाहिजे आरोपी नर आलम शेख, रा. चेंबुर यांनी आपआपसात संगनमत करून 06 महिलांना बॉडी मसाज करण्याचे नावाने प्राप्त केल्या. त्या महिलांना वेश्या व्यवसायासाठी बनावट ग्राहकास दाखवून व्यवसायाचा मोबदला म्हणून 6000/- रूपये स्विकारले.


महिला आरोपी व पाहिजे आरोपी यांचे विरूध्द वाशी पोलीस ठाणे येथे गु. रजि.नं. 627/2025, भा.न्या.सं. कलम 143 (3), 3(5), सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम 1956 चे कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हयातील अटक महिला आरोपीची दिनांक 04/12/2025 रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड मंजुर आहे. गुन्हयाचा तपास वाशी पोलीस ठाणे करत आहे. सदरची कारवाई सहा. पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोडे, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि पृथ्वीराज घोरपडे, सपोनि योगेश देशमुख, पोउपनिरी सरिता गुडे, पोहवा  मांडोळे, पोशि ठाकुर, पोशि चव्हाण, पोशि पारासुर, पोशि चव्हाण, पोहवा अडकमोल, पोना अनिता भोये तसेच चालक पोहवा मोहिते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top