नवीन बातम्या
आंतरजिल्हा बदलीग्रस्त शिक्षकांचे आझाद मैदानात मुंडन आंदोलन
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री पदाची दशकपुर्ती निमीत्त   रामदास आठवले यांचा भव्य नागरी सत्कार  
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

*खारघर येथे पार पडलेल्या डेव्हिल्स सर्किट २०२५ ला मेडिकव्हर हॉस्पिटल्सकडून चोवीस तास वैद्यकिय मदत*


4k समाचार
*नवी मुंबई* : भारतातील सर्वात लोकप्रिय आणि आव्हानात्मक अशा शर्यत स्पर्धांपैकी एक असलेल्या मारुती सुझुकी अरेना डेव्हिल्स सर्किट २०२५ साठी मेडिकव्हर हॉस्पिटल्सने वैद्यकिय मदतीकरिता हात पुढे सरसावला. खारघर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात ४,५६७ धावपटू आणि १,६७८ प्रेक्षक सहभागी झाले होते. 



वैद्यकीय सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, मेडिकव्हर हॉस्पिटल्सने याठिकाणी पूर्णपणे सुसज्ज अशी वैद्यकीय सेवा पुरविली. संपूर्ण कार्यक्रमादरम्यान डॉक्टर, परिचारिका, २ रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवेसंबंधीत टीम याठिकाणी हजर होती आणि गरज पडल्यास त्वरित वैद्यकीय सेवा पुरविण्यात आल्या. या टीमने ६००+ हून अधिक रुग्णांशी संवाद साधला, ज्यामध्ये किरकोळ दुखापतींवर प्रथमोपचार, हायड्रेशन सपोर्ट, स्नायूंसंबंधी दुखापतींचे व्यवस्थापन, थकवा आणि इतर आवश्यक वैद्यकीय मदतीचा समावेश होता.



डेव्हिल्स सर्किट ही भारतातील पहिली आणि सर्वात प्रतिष्ठित धावण्याची शर्यत आहे, जी तिच्या आव्हानात्मक लष्करी शैलीतील अडथळ्यांसाठी ओळखली जाते. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना धावण्यासोबतच, चढणे, निसरडा मार्ग ओलांडणे, पाण्यातून मार्ग काढणे, चिखलातून धावणे इत्यादी अनेक अडथळ्यांमधून जावे लागते. हा कार्यक्रम उच्चभ्रू खेळाडू, फिटनेस प्रेमी, कॉर्पोरेट गट आणि पहिल्यांदा धावणाऱ्या धावपटूंना आकर्षित करतो ज्यामुळे सहनशक्ती, टीमवर्क आणि मानसिकदृष्ट्या बळकटी वाढते. सेंटर हेड संदीप जोशी यांच्यासह मेडिकव्हर हॉस्पिटल टीमने या शर्यतीत भाग घेतला. 



या उपक्रमाविषयी बोलताना, मेडिकव्हर हॉस्पिटल्सचे नवी मुंबई येथील सेंटर हेड संदीप जोशी म्हणाले, डेव्हिल्स सर्किट २०२५ साठी आम्हाला आरोग्य सेवा पुरविण्याची संधी मिळाली याचा अभिमान वाटतो. अशा कार्यक्रमांमुळे लोकांना त्यांच्या निरोगी जीवनशैली स्वीकारण्यास प्रेरणा मिळते. आमच्या टीमने प्रत्येक सहभागी खेळाडूंना वेळीच वैद्यकीय मदत पुरवत या कार्यक्रमाला पाठिंबा दिला.
मेडिकव्हर हॉस्पिटल्सच्या माध्यमातून अशा प्रकारे अनेक क्रीडा उपक्रमांना पाठिंबा दिला जात असून नागरी आरोग्यास प्रोत्साहन दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top