4k समाचार
पनवेल दि. ०८ ( वार्ताहर ) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना न्याय मिळणेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते बबनदादा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेल तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले व नायब तहसिलदार (महसूल) तथा कार्यकारी दंडाधिकारी श्रीमती राजश्री जोगी यांना निवेदन देण्यात आले .

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी व सरसकट हेक्टरी ५०,००० ची मदत मिळावी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे, अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना जुने निकष न लावता योग्य आणि पुरेसा मोबदला त्वरित देण्यात यावा, पिक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम तरी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा प्रकारच्या प्रमुख मागण्यांनाचे निवेदन देण्यात आले. तसेच या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या प्रसंगी दिला.

यावेळी शिवसेना उपनेते बबनदादा पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत ,उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर प्रमुख अवचित राऊत, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, शहर प्रमुख प्रवीण जाधव, शहर प्रमुख यतीन देशमुख, शहर प्रमुख सदानंद शिर्के, शहर प्रमुख सूर्यकांत म्हसकर, युवासेना जिल्हा अधिकारी पराग मोहिते, विधानसभा अधिकारी अजय पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ. अनीता डांगरकर, सौ. तनुजा झुरे, उपमहानगर संघटिका योजना शिंदे, सौ. समीक्षा पांगम, सौ. अर्चना क्षीरसागर, सौ. श्रद्धा जाधव, शहर संघटिका सौ. ज्योति मोहिते, सौ. संगीता राऊत, सानिका मोरे, सौ. सामीना कुडाळकर यांच्या सह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
