पनवेल दि.०8 (वार्ताहर): मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना विविध मागण्यांसंदर्भात दिव्यांग समिती तर्फे निवेदन देण्यात आले.

मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना दिव्यांग संघटने तर्फे पनवेल महानगरपालिका हद्दीतील दिव्यांग स्टॉल धारकांना त्वरित परवाने मिळावे याचे निवेदन देण्यात आले. यावेळी समाजसेवक कामगार नेते., महाराष्ट्र दिव्यांग विकास फाउंडेशनचे. जिल्हाप्रमुख.भरत ज्ञानदेव जाधव, दिव्यांग विकास आघाडीचे उत्तर जिल्हा संयोजक विलास फडके, अतुल रायबोले, नवनाथ गाढवे यांच्यासह इतर दिव्यांग बांधव उपस्थित होते.
