नवीन बातम्या
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार
बाल कविता संमेलनमध्ये सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई स्कुलच्या कु.काव्या सिंगची चमकदार कामगिरी
चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या शिक्षकेतर कर्मचा-यांच्या क्रिकेट संघास आंतरमहाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद
लोकनेते रामशेठ ठाकूर शाळांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण; २३ विद्यार्थ्यांचा गौरव
निलेश  सोनावणे सर्वांना न्याय देणारा सामाजिक कार्यकर्ता : लोकनेते  माजी खासदार रामशेठ ठाकूर  

फुंडे विद्यालया मध्ये विविध उपक्रमांना उदंड प्रतिसाद
झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने केले रक्षाबंधन सण साजरा.

4k समाचार
उरण दि ९(विठ्ठल ममताबादे )रयत शिक्षण संस्थेच्या तुकाराम हरी वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे शाखेत विद्यालयाचे प्राचार्य बी बी साळूंखे यांच्या मार्गदर्शनाखाली राखी तयार करणे, पोस्टर मेकिंग, राखी प्रदर्शन, वृक्षाबंधन, क्रांतिदिन असे विविद्य कार्यक्रम संपन्न झाले. 

बहीण भावाच्या पवित्र नाते जपणाऱ्या रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून इयत्ता ५ ते १० च्या विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करणे हा उपक्रम घेण्यात आला. या मध्ये १७० विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता व कलात्मकता वाढविणे तसेच सामाजिक शैक्षणिक व पर्यावरण संबंधित इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत वृक्ष संवर्धन विषयावर पोस्टर मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. या मध्ये ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आहे. साऱ्या सजीव सृष्टीचा आधार पर्यावरण आहे वृक्षानाच भाऊ मानून राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम संपन्न झाला. 

तसेच सर्व वर्गामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. क्रांती दिनाचे औचित्य साधून क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. कु नगमा मन्सूरी, अमृता जाधव, ज्योती महतो, स्वरांजली गोरे यांचे भाषणे झाली. उपशिक्षक आर जी शेळके यांनी रक्षाबंधन व क्रांतिदिनाची सविस्तर माहिती सांगितली. सदर कार्यक्रमास विशेष सहकार्य उपशिक्षक एन के पाटील, एस डी नाईक,एस डी म्हात्रे उपशिक्षिका एस एस म्हात्रे व सेवकवृंदाचे लाभले. 

विविध स्पर्धा मध्ये प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य बी बी साळूंखे व उपस्थित सेवक वृंदाच्या शुभहस्ते भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेदिका पाटील व आभार एच एन पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top