4k समाचार दि. 9 (संजय कदम)
सरगम लायन्स तर्फे पनवेल शहर पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधुन रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला.

याप्रसंगी पनवेल शहर पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे, इतर अधिकारी वर्ग तसेच महिला आणि पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांना राखी बांधण्यात आली तसेच मिठाई देण्यात आली.

याच प्रसंगी पनवेल मधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, बाळु जुमलेदार आणि राजेश डांगळे यांना ही राखी बांधण्यात आली.
या कार्यक्रमाला सरगम क्लबचे अध्यक्ष प्रेमेंद्र बहिरा, सचिव आदित्य दोशी, माजी अध्यक्ष स्वाती गोडसे, मानदा पंडित, संजय गोडसे आदि सभासद उपस्थित होते.
