पनवेल दि.२७(संजय कदम) सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल तर्फे महिला दिनानिमित्त अभिनव उपक्रम राबवण्यात येणार आहे.

महिला दीना महिला सदस्यांना आपल्या घरी पुन्हा वापरणे योग्य जुने कपडे व्येवस्थित धुऊन घडी करून द्यावे अथवा भेट आलेल्या पण आपण वापरत नसलेल्या नवीन साड्या देखील चालतील त्या दिनांक ५ मार्च २०२५ पर्यंत आपल्या ऑफिस मध्ये द्याव्या. सादर कपडे आदिवासी पाड्यावर वाटप केले जातील किंवा त्याचा पुनर्वापर करता येईल अस्या संस्थांना संपूर्द केल्या जातील

.यासाठी उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघा तर्फे करण्यात आले आहे. यासाठी शॉप नं. १७, गेहलोत रेसिडेन्सी, सेक्टर -१S, नवीन पनवेल या ठिकाणी संध्याकाळी ०७ ते ०९ या वेळेत प्रिया खोबरेकर( 9322645693), प्रिता भोजने (9969391352) यांच्याशी संपर्क साधावा
