शिव्या देणं हे अपमानास्पद वागणूक देण्यासारखे आहे. भांडणात शिव्या दिल्यास लहान मुलांवर देखील याचा वाईट परिणाम होतो. यामुळेच महाराष्ट्रातील सौंदाळा गावाने अपशब्द वापरणारे तसेच आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांविरोधात नवा नियम लागू केला आहे.

येथील सरपंच शरद अरगडे यांनी ग्रामसभेत याबाबत ठराव पारित केलाय. या नियमानुसार आता सौंदाळ गावात शिवीगाळ करणाऱ्यांना 500 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. महिलांच्या सन्मान आणि स्वाभिमानाच्या विरोधात अपशब्द वापरणाऱ्यांच्या विरोधात हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
