नवीन बातम्या
कामोठ्याची वाहतूक आता राहणार ‘कंट्रोल’मध्ये — प्रशासनाचा मोठा निर्णय!
रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांची सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएससी स्कूलला सदिच्छा भेट
शेकाप कार्याध्यक्ष कामोठे शहराचे गौरवभाई पोरवाल यांच्या माध्यमातून राबविण्यात आला समाजहिताचा संवेदनशिल आणि प्रबोधनात्मक उपक्रम
शनिवारी खारघरमध्ये ‘दिवाळी संध्या’
दीपावलीच्या आनंद सोहळ्यात मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल मैफिलीचा जल्लोष
शेकापच्या राजेंद्र पाटीलवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल
आपल्या जवळच्या माणसाच्या साथीने वाढदिवसा साजरा करताना पुढे जगण्याची उर्मी मिळते रमेश गुडेकर
भाजपा पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या सुगंधी उटण्याचे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन
उरण वाहतूक शाखेकडून यु इ एस स्कूल मध्ये सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन

रामकी कंपनी संरक्षण भिंत कोसळली; आमदार प्रशांत ठाकूर यांची घटनास्थळी पाहणी; गावकऱ्यांसोबत समिती नेमण्याची सूचना

  पनवेल (प्रतिनिधी) 4kNews रामकी कंपनी भोवती बांधण्यात आलेली संरक्षण भिंत गुरुवारी कोसळली. सुरक्षा भिंतीवर लिचडचा भार येऊ नये, याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे ही भिंत कोसळ्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान यासंदर्भात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आणि या अनुषंगाने योग्य उपाययोजना करण्याची गरज लक्षात घेता गावकऱ्यांसोबत एक समिती नेमावी अशी सूचना त्यांनी केली. या नुसार येत्या सोमवार किंवा मंगळवारी पनवेल महापालिका, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळासोबत बैठक होणार आहे.     

   

तळोजा एमआयडीसीसह मुंबई परिसरातील कंपन्यांच्या रासायनिक कचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्याचे काम रामकी ग्रुपची मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी करते. दोन वर्षापूर्वी येथील प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी कंपनीभोवती सुरू केलेल्या उंच सुरक्षाभिंतीला विरोध केला होता. सिद्धी करवले येथील स्थानिकांनी आंदोलन केले होते. वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेली भिंत गुरुवारी कोसळली. सिद्धी करवले गावात जाणाऱ्या एकमेव रस्त्याला लागून असलेली भिंत कोसळल्यामुळे ग्रामस्थ चिंतेत आहेत. कंपनीतील रसायनयुक्त लिचडचा भार भिंतीवर टाकल्यामुळे ती कोसळल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सुरक्षाभिंतीवर लिचडचा भार येऊ नये, याची काळजी घेणे गरजचे असूनही निष्काळजीमुळे स्थानिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करत स्थानिकांनी पोलिस उपायुक्त, एमआयडीसी प्रदूषण नियंत्रक मंडळ आर्दीकडे तक्रार केली आहे.

साधारणतः ३० ते ३५ फूट उंचीच्या भिंतीवर कचऱ्याचा मोठा लोड आल्याने ही घटना घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी या संदर्भात काळजी न घेतल्यास भविष्यात याठिकाणी मोठे अपघात घडू शकतात. १०० एकरात ही कंपनी कार्यान्वित आहे. रासायनिक आणि वैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया करून विघटित केला जातो. मात्र, कंपनीकडून नियम पाळले जात नसल्याचा आरोप अनेक वेळा केला गेला आहे. 

 संरक्षण भिंत कोसळल्याने या घटनेच्या पार्श्वभुमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी घटनास्थाळी आज भेट दिली. या ठिकाणी जिथे भिंत पडली तेथे भिंतीचा आणखी भाग पडण्याचीही शक्यता असल्याने त्यासंदर्भात त्यांनी उपाययोजना संदभात आयुक्तांशी चर्चा केली. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, माजी नगरसेवक हरेश केणी, रवीकांत म्हात्रे, माजी सरपंच गोपीनाथ पाटील, संतोष पाटील, रमेश मढवी, सुरेश पोरजी, माजी सरपंच विष्णू मढवी, संतोष मढवी, वासुदेव मढवी, राजेश महादे यांच्यासह मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top