थंडीची चाहूल लागताच पनवेलमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे, धुलिकणांच्या त्रासामुळे श्वसनविषयक आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.

पालिकेच्या दवाखान्यातून मोफत उपचार केले जात असले तरी खासगी दवाखान्यातील रुग्णांचा ओघही कमी झालेला नाही. दरम्यान, पालिकेने सर्व दवाखाने आता पूर्णवेळ म्हणजेच सकाळी 10 ते रात्री 10 असे बारा तास सुरू ठेवले असल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.
