नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करा – आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पनवेल(प्रतिनिधी) कासाडी नदी संवर्धनाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे.  

 या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील कासाडी नदीच्या संवर्धनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. कासाडी नदीपात्रात अत्यंत घातक दुषित पाणी सोडले जाते,

त्यामुळे परिसर अत्यंत प्रदुषित झाला आहे व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. या नदीत होणाऱ्या प्रदुषणाबाबत परिसरातील नागरिकांच्या तक्रारी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत. घातक वायू रसायने प्रक्रिया न करता नदीमध्ये सोडल्यामुळे नदीमधील जैवविविधता धोक्यात आली असून सदर नदीच्या संवर्धनासंदर्भात मी वारंवार शासनाचे लक्ष वेधले आहे.

शासनाकडून नदीच्या संवर्धनाबाबत तातडीने पाऊल उचलणे गरजेचे असून तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कासाडी नदीच्या संवर्धनाच्या कामास लवकरात लवकर सुरूवात करण्याचे आदेश संबंधिताना देण्यात यावे, असेही या निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top