📍 विभाग : कामोठे
📅 दि. १८ जुलै २०२५
कामोठे परिसरात मागील काही दिवसांपासून जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, भाजप कामोठे मंडळ अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री. विकास घरत यांनी थेट पुढाकार घेत नागरिकांच्या समस्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या. त्यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी मा. चहारे (AE) आणि मा. देवरे (AAE) यांच्यासमवेत विविध सोसायट्यांना भेट दिली.

या दौऱ्यात नागरिकांनी कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, अपुरा आणि असमान वितरण, अशा महत्त्वाच्या तक्रारी मांडल्या. श्री. विकास घरत यांनी या समस्या ठामपणे मांडत समाधानकारक तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रमुख उपाययोजना पुढीलप्रमाणे:
✅ अतिरिक्त पाईपलाइनचे काम लवकरच सुरू करून पाणीपुरवठा सुधारला जाईल.
✅ कमी दाबाच्या भागांमध्ये दाब वाढवून पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल.
✅ जर तरीही पुरवठा अपुरा राहिला, तर टँकरद्वारे नियमितपणे पाणी पुरवले जाईल.

विकास घरत यांच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे आणि नागरिकांचे प्रश्न गांभीर्याने घेतल्यामुळे कामोठेकरांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले की, नागरिकांना आवश्यक तेवढे पाणी वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही केली जाईल.

➡️ विकास घरत यांचा हा पुढाकार कामोठेतील नागरी समस्यांवर भाजपाचा ठोस हस्तक्षेप अधोरेखित करतो.
