नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्‍चित ः उमेदवार लिना गरड…


पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला पनवेल विधानसभा 188 महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. व आज कर्जत येथील मेळाव्यात त्यांनी लिना गरड यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आशिर्वादामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचे मत महाविकास आघाडीचे उमेदवार लिना गरड यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले आहे.


आज पनवेल परिसरात मशालीला अनुकूल वातावरण असून मतदार मोठ्या प्रमाणात मशालीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले आहेत, हे दिसून आले आहे. कमी कालावधीमध्ये केलेला प्रचाराचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सुद्धा केला आहे. आज मशाल हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचले असून, पनवेलमधील अनेक समस्या सोडविण्यासाठी सत्तेमध्ये गेल्यावर पनवेलमध्ये लिना गरड याच सोडवू शकतात.

याचा ठाम विश्‍वास मतदारांना आहे. मालमत्ता कराचा प्रश्‍न, दुहेरी कर, शास्ती, पनवेलमधील पाण्याचा प्रश्‍न, रस्त्यावर पडलेले खड्डे, अद्ययावत हॉस्पिटल नसणे, मैदान नसणे, गार्डन नसणे यासारख्या सुविधा देण्यास पनवेलचे आमदार असफल ठरले असल्याने यंदाच्या निवडणुकीत मतदार हे निश्‍चितपणे महायुतीच्या पाठीमागे उभे राहून मशाली समोरचे चिन्हाचे बटण दाबतील. बाळाराम पाटील यांना समज देवू सुद्धा ते आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो वापरत आहेत.

तसेच अनेक वेळा प्रचाराला जाताना आमच्या कार्यकर्त्यांना धमकावत आहेत. परंतु या धमक्यांना आम्ही भीक घालत नसून आम्ही बाहेरील उमेदवार असलो तरी आता पनवेलमध्ये आम्ही समरस झालो आहोत. त्यामुळे मतदार सुज्ञ आहेत. शिक्षित आहे. जो नागरिकांचे प्रश्‍न सोडवू शकतो अशा उमेदवारांच्या पाठीमागे नागरिक ठामपणे उभे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेच फक्त बाळाराम पाटील यांच्या प्रचारार्थ फिरत आहेत. तर या उलट त्यांचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या बरोबर ठामपणे उभे असल्याने येत्या 23 तारखेला निवडणुकीच्या वेळी ते दिसून येईलच. पनवेलचा विकास करण्यासाठी मला बहुमताने निवडून द्या असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले आहे.
फोटो ः लिना गरड प्रचार सभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top