पनवेल (4K News)उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा क्षेत्रात संभाव्य लढतीची शक्यता…..
पनवेल तालीक्यातील ग्रामीण क्षेत्रात शिट्टी आघाडी घेऊ शकते. इथे कमळ दोन नंबर वर जाऊ शकते.

तसेच पंनवेल शहर आणि आजूबाजूचा परिसर आणि कामोठे येथेच कमळ आघाडी घेऊ शकते तसेच इथे मशाल दुसऱ्या नंबर वर असू शकते.
खारघर आणि आजूबाजूचा परिसर इथे मशाल चा जोर असू शकतो. तरीही इथे भाजपा ला मानणारी खूप लोक असल्यामुळे कमळ आणि मशाल मध्ये कोण पहिला यात स्पर्धा होऊ शकते.
महिला उमेदवार असणाऱ्या सौ लीना अर्जुन गरड यांना महिलांचा आणि सुशिक्षित उमेदवार म्हणून काही प्रमाणात अनेक मतदारांची पसंती मिळू शकते.
तसेच पूर्ण पनवेल विधानसभा क्षेत्रात रामशेठ ठाकूर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यांची मते कमळ ला मिळू शकतात.
थोडक्यात काय तर पूर्ण पनवेल विधानसभा मतदार संघात काही ठिकाणी कमळ आणि मशाल आणि आणि काही ठिकाणी कमळ आणि शिट्टी मध्ये मध्ये काटेकी टक्कर होऊ शकतो.

