संविधान दिन उत्साहात साजरा


4k समाचार
पनवेल दि. २६‌ (प्रतिनिधी) – भारताच्या संविधान स्वीकृती दिनानिमित्त पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, माजी मंडलाध्यक्ष भूपेंद्र पाटील, अनेश ढवळे, अंकुश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने होऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी भूपेंद्र पाटील यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन घडवून आणले. लोकशाही, न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे महत्त्व नागरिकांनी सदैव जपले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
संविधान दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि लोकशाही मूल्यांच्या संवर्धनासाठी सक्रिय राहण्याची प्रतिज्ञा केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top