महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करणाऱ्या अमेरिकेतील व्यक्तीविरोधात मुंबई सायबर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

सय्यद शुजा असे या व्यवतीचे नाव आहे. शुजाच्या दाव्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएम हॅकिंगबाबत राज्य आणि देशभर चर्चा सुरू झाली आहे.
