नवीन बातम्या
*नवी मुंबईत न्यूईरा हॉस्पिटलचे ‘ॲलर्जी क्लिनिक’ सुरू; १५० ॲलर्जन्स तपासणीचा घेता येणार लाभ*
महाराष्ट्र सरकारने चवदार तळे परिसराच्या सुशोभीकरणासाठी सुमारे 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विशेष आभार
इनरव्हील क्लब गॅलेक्सी न्यू पनवेल क्लबचा हॅपी स्कूल प्रोजेक्ट
पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लालचंद यादव  यांची बिनविरोध निवड
पहाटे वाहनांना आग
सिडको–नैना अधिसूचित क्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तात्काळ कार्यवाहीचे निर्देश
चांगू काना ठाकूर आर्टस् , कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज , न्यू पनवेल (अधिकारप्रदत्तस्वायत्त)   महाविद्यालयातील कौशल्याधारीत उपक्रमांचे संपर्क अभियान

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘दिबां’च्या नावासाठी कृती समिती ठाम -लोकनेते रामशेठ ठाकूर
माथेरान नगरपरिषदेवर महायुतीची सत्ता; भाजपच्या पनवेल कार्यालयात विजयी उमेदवारांचा सत्कार

खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम

4k सामाचार
पनवेल दि. १५ ( संजय कदम ) :  अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमेअंतर्गत आज दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीमध्ये विविध प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमात वपोनि स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमा दरम्यान अधिकाऱ्यांनी  अमली पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत जनतेला माहिती देऊन जनजागृती केली.


या अंतर्गत येथील सी के टी कॉलेज खांदा कॉलनी ते खांदेश्वर पोलीस ठाणे येथे मानवी साखळी व पायी रॅली यात 110 विद्यार्थी शिक्षक व पो. अधिकारी व अंमलदार यांचा सहभाग होता . त्यानंतर  खांदेश्वर पोलीस ठाणे येथील सायकल रॅली यात रोटरी क्लब सहभाग होता . त्यानंतर रायन स्कूल सेक्टर ११ येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले तसेच  एनएमएमटी बस डेपो आसुडगाव येथे जनजागृती अभियान त्याच प्रमाणे सेंट जोसेफ स्कूल, सेक्टर-७, नवीन पनवेल येथे जनजागृती अभियान तर पनवेल रेल्वे स्टेशन येथे जनजागृती अभियान तसेच आदई ग्रामपंचायत येथे ,बालाजी स्प्लेंडर फेज २, आदई  येथे अष्टविनायक गृह संकुल फेज २ सोसा. आदई येथे  सन बेन सोसायटी आसुडगाव ,पुष्प विनायक  कॉम्प्लेक्स आदई गाव येथे सुद्धा अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिम राबविण्यात आली.  याला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती  वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी यावेळी दिली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top