नवीन बातम्या
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन
राज्यातील राज्यस्तरीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार जाहीर; ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
परिमंडळ 3 सहाय्यक पोलीस आयुक्तपदी मयुर भुजबळ ; पदभार स्वीकारला

बिग बॉस १९ फिनाले : खारघरच्या प्रणित मोरेला विजेता करा – आमदार ठाकूर यांचे नागरिकांना आवाहन


 
4kNews दि. 4
पनवेल (प्रतिनिधी) लोकप्रिय रिअॅलिटी शो असलेल्या बिग बॉस १९ सीझनच्या ग्रँड फिनालेमध्ये स्पर्धक प्रणित मोरे यांना विजयी करण्याचे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे. स्थानिक पातळीवरून पुढे येत राज्यभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या प्रणित मोरे यांनी आपल्या शांत, संयमी आणि सकारात्मक स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात विशेष ठसा उमटवला आहे. देशभरात प्रचंड लोकप्रिय असलेल्या या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये प्रणित मोरे एकमेव मराठी स्पर्धक असून, तोही आपल्या खारघरचा असल्यामुळे संपूर्ण पनवेल-खारघर-नवी मुंबई परिसरासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे आमदार ठाकूर यांनी सांगितले. 



आमदार प्रशांत ठाकूर यांनी आवाहन करताना पुढे म्हंटले कि, बिग बॉस या हिंदी शो ने संपूर्ण देशभरातील प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. आपल्या पनवेल खारघर नवी मुंबई परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात या इंड्रस्टीचे लोकं आणि चाहते आहेत. त्यामुळे “आपला प्रणित मोरे बिग बॉस झाला पाहिजे,” यासाठी नक्कीच प्रत्येक जण योगदान देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ग्रँड फिनालेसाठीचे मतदान सध्या सुरू झाले असून ०६ डिसेंबरपर्यंत हे मतदान चालू राहणार आहे. 

नागरिकांनी स्वतः तसेच मित्र-परिवारासह प्रणित मोरे यांना मतदान करून त्यांना बिग बॉसचा विजेता बनवावे, असे आवाहन आमदार ठाकूर यांनी केले आहे.“प्रणित मोरे हा आपल्या परिसराचा अभिमान आहे. त्याने बिग बॉसमध्ये प्रामाणिक, सुसंस्कृत व सकारात्मक खेळ सादर केला. त्याच्या मेहनतीला आणि प्रामाणिकतेला आपण सर्वांचा भरभरून पाठिंबा मिळायला हवा. फिनालेतील त्याचा विजय हा आपल्या सर्वांचा विजय ठरेल. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन प्रणितला बिग बॉस बनवावे,” असेही आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top