लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्षनिमित्त आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा

4kNews दि. 4

पनवेल (प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवीवर्षनिमित्त चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज (अधिकारप्रदत्त स्वायत्त) अर्थात सीकेटी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेचे उद्‌घाटन जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत व चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य  प्रो. डॉ. एस.के.पाटील यांच्या हस्ते आज (दि.४) करण्यात आले. 



या  स्पर्धेमध्ये ११० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिमखाना विभागाचे चेअरमन डॉ. व्ही. बी. नाईक, सहसंचालक प्रा. अनिल नाक्ती, प्रा. भरत जितेकर व प्रा. प्रतिज्ञा पाटील जिमखाना विभागाचे सर्व सदस्य विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top