नवीन बातम्या
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उरण मधील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्या जाहीर. उरण शहर संघटक पदी  विजय दिलीप जाधव, उपशहरप्रमुख पदी फते खान सोंडे व युवती सेना उरण तालुका संघटिका पदी कु. नेहा रुपेश भगत यांची नियुक्ती.
करंजाडेच्या विकासासाठी आणखी एक ठोस पाऊल!
*केदार भगत यांच्या पुढाकाराने कोळेश्वर विद्यामंदिरात रेनकोट व छत्री वाटप*
*आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजनाचे विशेष कौतुक*
माची प्रबळगडावर रस्ता चुकलेल्या दोन अल्पवयीन पर्यटकांची सुखरूप सुटका.
रोटरी क्लब ऑफ पनवेलतर्फे प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘व्होकेशनल एक्सलन्स अवॉर्ड’ प्रदान होणार
पनवेलमध्ये ‘महारोजगार मेळावा २०२६’ला हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांनी घेतला लाभ
उरण महाविद्यालयात जपानी भाषा  प्रशिक्षणाची सुरुवात.
महाराष्ट्रातील २७+६ ओबीसी जातींच्या केंद्राच्या यादीतील समावेशासाठी दिल्लीत जोरदार पाठपुरावा. महाराष्ट्र ओबीसी कृती समिती व पवार मिशनचा तीन दिवसीय दौरा यशस्वी.
कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात मे. अमेया कंपनीतील कामगारांना ७२०० रुपये पगारवाढ. न्यु मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचा या वर्षातील ९ वा पगारवाढीचा करार.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा पत्रकार परिषदेकडून सत्कार

पनवेल दि. ११ : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि पनवेल महानगर प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार तथा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे विश्वस्त तथा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख आणि अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.


यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे, ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी, विजय पवार, रत्नाकर पाटील, हरेश साठे, नितीन कोळी यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.


कार्यक्रमात रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक, राजकीय आणि जनसामान्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या कार्याचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत भविष्यातही समाजहितासाठी असेच कार्य सुरू ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top