कळंबोली बस स्थानकातील कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेची सोन्याची बॅग परत


पनवेल दि.  10  (वार्ताहर) : कळंबोली बस स्टॉप येथे विसरलेली सोन्याचे दागिने असलेली बॅग स्थानकातील नियंत्रण विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संबंधित महिलेला सुखरूप परत मिळाल्याची घटना घडली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, कमरजहा मोहम्मद रफीक शेख (वय ३८ वर्षे) या महिला कळंबोली बस स्टॉप परिसरात आपली सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरून गेल्या होत्या. ही बाब लक्षात येताच बस स्टॉप नियंत्रण म्हणून कार्यरत असलेले श्री. नितीन भिकू भारती यांनी तत्परता दाखवत बॅग सुरक्षित ताब्यात घेतली व संबंधित महिलेशी संपर्क साधून ती परत केली.


या प्रामाणिकपणा व सतर्कतेबद्दल कळंबोली पोलीस स्टेशनच्या वतीने एपीआय डफळ सर तसेच पोलीस हवालदार हराळे सर यांच्या हस्ते श्री. नितीन भारती यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
या घटनेमुळे श्री. नितीन भारती यांच्या प्रामाणिकपणाचे व कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top