*जिवाची पर्वा न करता बीट मार्शल यानी पाण्यात   बुडत  असलेल्या महिलेचा जीव वाचवला*

4kNews कामोठे
आज दिनांक 10/5/2026 रोजी कंट्रोल रूम येथून बीट मार्शल १ च्या म. डी. टी. वर १२.३० वाजता संदेश प्राप्त झाला की रोडपाली गणपती विसर्जन तलावमध्ये एक महिलेने पाण्यात उड़ी मारली आहे  पोलीस मदतीची आवश्यकता आहे. 


  कळंबोली पोलीस ठाणे बीट मार्शल 1 वारिल पो शिपाई 12336 /आकाश वानखेडे आणि पोलीस शिपाई 4349/ सागर माळी हे ताबडतोब घटनास्थळी 12.33 वाजता पोहोचले. त्याना तलावा मध्ये पाण्यात उड़ी मारलेली महिला बूड़त असल्याचे दिसल्याने पोलीस शिपाई क्रमांक 4349  सागर माळी याने जिवाची पर्वा न करता तत्काल पाण्यात उडी मारून सदर महिलेस तलावातून सुखरूप बाहेर काढले आणि आशा हॉस्पिटल येथे पोलीस गाडीत बसून उपचारासाठी दाखल केले.  


डॉक्टरांनी तपासून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
   हॉस्पिटलमध्ये महिलेचा भाऊ हजर झाला असून पुढील उपचारासाठी MGM हॉस्पिटल येथे पोलीस गाडीने  उपचारासाठी रवाना केले आहे.
महिलेचे नाव- अनिता बालाजी नांदे वय 35 , कलंबोली ही काहिशी मनोरुग्ण आहे.

      

🎽

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top